संगमनेर: मुलाला डबा घेऊन जाणाऱ्या आईवर काळाचा घाला
Sangamner Accident: खडी क्रशरमध्ये काम करत असलेल्या मुलासाठी जेवणाचा डबा घेऊन जाणाऱ्या आईचा कार अपघातात जागीच मृत्यू.
संगमनेर: खडी क्रशरमध्ये काम करत असलेल्या मुलासाठी जेवणाचा डबा घेऊन जाणाऱ्या आईचा कार अपघातात जागीच मृत्यू झाला. हा अपघात संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी परिसरात एका हॉटेलसमोर बुधवारी दीड वाजेच्या सुमारास घडला.
हिराबाई बाळशिराम दिघे (वय ५२ वर्षे, रा. माहुली ता. संगमनेर जि.अ.नगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. मुलगा रेवणनाथ बाळशिराम दिघे (वय २७ वर्षे, रा. माहुली) याने दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक मुनीरत्नम (रा. बेंगळुरू राज्य-कर्नाटक) याच्याविरुद्ध घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हिराबाई दिघे या माहुली येथील रहिवासी होत्या. नेहमीप्रमाणे आई हिराबाई या बुधवारी दुपारी नाशिक- पुणे महामार्गाच्या कडेने माहुलीहून खंदरमाळवाडीकडे पायी चालत जेवणाचा डबा घेऊन जात होत्या. त्याच दरम्यान नाशिककडे जाणारी कार क्रमांक एम.एच.१२ एम. आर. ४३२० ने हिराबाई यांना जोराची धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच ठार झाल्या. पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी, हवालदार नारायण ढोकरे यांसह पोलिस नाईक राजेंद्र लांघे यांनी अपघातस्थळी जाऊन मृतदेह संगमनेर येथे पाठविला.
Web Title: mother carrying a lunch box for her child died on the spot in a car accident
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App