आईने रागावले, विद्यार्थिनीची आत्महत्या
शाळेत जाण्याच्या कारणावरून आई रागावली म्हणून एका नववीतील विद्यार्थिनीने घरी आत्महत्या (suicide).
नागपूर: शाळेत जाण्याच्या कारणावरून आई रागावली म्हणून एका नववीतील विद्यार्थिनीने घरी आत्महत्या केली. कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
नंदिनी महेश लांजेवार (१५) असे मृत मुलीचे नाव आहे. नंदिनी ही सर्वसाधारण कुटुंबातील मुलगी होती. २१ फेब्रुवारी रोजी तिच्या आईने तिला शाळेत जाण्याच्या मुद्दयावरून रागावले. तसेच परीक्षा जवळ आली असल्याने अभ्यास करण्याबाबत देखील म्हटले. यावरून नंदिनी संतापली. दुपारी एक वाजताच्या सुमारास कुणाचेही लक्ष नाही हे पाहून संतापाने तिने घरीच विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर काही वेळातच तिची प्रकृती खराब झाली.
Web Title: Mother angry, student commits suicide
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App