मान्सून आला रेeeee! पुढील 24 तासांत अंदमानात बरसणार आणि पुढे….
Monsoon Update : मान्सून पुढच्या 24 तासांत अंदमान निकोबार बेट समुहात दाखल होत असल्याची माहिती IMD नं दिली.
मुंबई: उकाड्यानं हैराण झालेल्या प्रत्येकासाठीच ही अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. कारण, आता अवघ्या काही दिवसांतच तुमची उकाड्यापासून सुटका होणार आहे. लांबणीवर गेला म्हणता म्हणता आता मान्सून पुढच्या 24 तासांत अंदमान निकोबार बेट समुहात दाखल होत असल्याची माहिती IMD नं दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच आयएमडी आणि स्कायमेट या दोन्ही संस्थांकडून यंदाच्या मान्सूनची तारीख लांबणीवर पडल्याचं सांगण्यात आलं होतं. पण, त्यातच आता मान्सून अंदमानात वेळतच दाखल होत असल्याचं स्पष्ट होत आहे. इथून पुढं म्हणजेच केरळच्या किनारपट्टीवर मान्सून 3 ते 4 जूनपर्यंत दाखल होईल. आणि त्यानंतरच काही दिवसांनी तो महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचणार आहे.
दरम्यान, प्रवासाच्या पहिल्याच टप्प्यात मान्सून निकोबार, अंदमानचा दक्षिण भार आणि बंगालच्या उपसागर क्षेत्राला व्यापणार आहे. परिणामी पुढच्या पाच दिवसांमध्ये केरळच्या विविध भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या येण्याची बातमी मिळेल असं सांगण्यात येत आहे.
Web Title: Monsoon Update has come It will rain in Andaman during the next 24 hours
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App