Monsoon News | आनंदाची बातमी: यंदा मान्सून होणार या तारखेला दाखल..
पुणे | Monsoon News: यंदा मान्सून वेळेअगोदरच दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. दरवर्षी पाऊस २२ मेपर्यंत अंदमानमध्ये दाखल होत असतो. मात्र, यावर्षी पाऊस (rain) १३ ते १९ मे दरम्यान म्हणजे वेळेअगोदरच दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने वर्तविले आहे. यानंतर २० ते २६ मेपर्यंत पाऊस केरळमध्ये येणार असल्याची शक्यता आहे. तर तळकोकणामध्ये २७ मे ते २ जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याने पुढील ४ आठवड्यांच्या हवामानाचा अंदाज वर्तविला आहे. पाऊस सुरु होण्याची तारीख हवामान खात्याकडून १५ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. अंदमानच्या समुद्रावर १३ ते १९ मे दरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. दरवर्षी अंदबारमध्ये मान्सून २२ मेपर्यंत दाखल होत असतो. मात्र यंदा मान्सून वेळेच्या अगोदरच दाखल होणार आहे.
K S Hosalikar (IMD Pune ):
Rainfall forecast for coming 4 weeks by IMD;
Week 1 Rainfall over Andaman Sea could be good.
Week 2 and 3 indicates enhanced rainfall activity over Arabian sea.
In week 2 & ahead rainfall over the south peninsula and adjoining Southeast Arabian Sea will be above normal .
Web Title: Monsoon News Update arrive-earlier expected