अहमदनगर: मारहाण करून तरुणीचा विनयभंग
Ahmednagar News: आरोपींनी मारहाण करून फिर्यादी तरूणीच्या अंगावरील टीशर्ट फाडून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य, विनयभंगाचा (Molested) गुन्हा दाखल.
राहुरी | Rahuri: तरुणीच्या भावाला काहीएक कारण नसताना आरोपींनी मारहाण करून फिर्यादी तरूणीच्या अंगावरील टीशर्ट फाडून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.
याबाबत पोलिसांनी सांगितले, की दिनांक ३० जून रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास १९ वर्षीय तरूणीच्या भावाला त्याच्या घरासमोर येऊन आरोपींनी काहीएक कारण नसताना शिवीगाळ करून त्यास लाथा बुक्क्याने मारहाण केली. त्यावेळी त्याची बायको व बहिण दोघी भांडण सोडवण्यासाठी गेल्या. तेव्हा आरोपींनी फिर्यादी तरूणीस लाथा बुक्क्याने मारहाण करून तीच्या अंगावरील टि शर्ट फाडला. तसेच तीला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. त्याच बरोबर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
घटनेनंतर तरूणीने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तीच्या फिर्यादीवरून आरोपी रहीम मुन्ना शेख, अरबीना रहीम शेख (दोघे रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी) या दोघांवर गुन्हा रजि. नं. ८४६ / २०२३ नुसार भादंवि कलम ३५४, ३२३, ४२७, ५०४, ५०६ प्रमाणे मारहाण, धमकी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार औटी करीत आहेत.
Web Title: Molested of a young woman by beating
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App