अहमदनगर: अल्पवयीन मुलीचा विनयभंग, तरुणा विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा
Breaking News | Ahmednagar: रात्रीच्या वेळी मोकळ्या शेतात शौचास गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन पळून गेल्याची घटना.
श्रीरामपूर: बेलापूर येथील रामगड वसाहतीच्या मागे रात्रीच्या वेळी मोकळ्या शेतात शौचास गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन पळून गेल्याच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसांनी असलम सांडू शेख याच्या विरुद्ध पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
या घटनेबाबत पीडित मुलीच्या आजीने फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, शुक्रवार दि. २७ रोजी रात्री नऊ वाजता रामगड वसाहतीच्या मागील मोकळ्या जागेत मी व नात शौचास बसलो असता येथील रामगड येथील असलम सांडू शेख हा पाठलाग करत मागे आला. त्याने नातीचे दोन्ही हात धरुन उभे करुन लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच तू माझे म्हणणे मानले तर मी तुला नाकातील मुरणी आणून देतो, असे म्हणून तो पळून गेला. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध भा.दं.वि. कलम ३५४, ३५५ अ, ३५४ ड, सह बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा सन २०१२ चे कलम ८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी सपोनि आव्हाड हे पुढील तपास करत आहेत.
Web Title: molested of a minor girl is an offense under POCSO against the youth
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study