संगमनेर: वाहन आडवे लावून विवाहितेचा विनयभंग
Breaking News | Sangamner: घरी परतताना एका तरुणाने दुचाकीला दुचाकी आडवी लावून ३० वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना (Molested).
संगमनेर: मुलीला शाळेत सोडून दुचाकीवरुन घरी परतताना एका तरुणाने दुचाकीला दुचाकी आडवी लावून ३० वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना २६ जानेवारी रोजी सकाळी संगमनेर तालुक्याच्या पठार भागात निर्जन रस्त्यावर हा संतापजनक प्रकार घडला.
दरम्यान, महिलेने तेथुन स्वतः ची सुटका करून घर गाठले, मात्र घरी कोणी नाही, हे पाहून तरुणाने तिच्या घरात घुसून तिच्याशी गैरवर्तन केले. तेवढ्यात महिलेचा पती घरी आल्याचे पाहून त्याने पळ काढला. घारगाव पोलिसात महिलेने फिर्याद दिली. या प्रकरणी संकेत भिमाजी करंजेकर (रा. नांदूर खंदरमाळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पो. नि. संतोष खेडकर व स. पो. दि. आदिनाथ गांधले करीत आहेत.
10 वी व 12 विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इंग्रजी शिका – Education Portal
दरम्यान, ग्रामीण भागातून महिला, मुली शिक्षणासाठी गावात जातात, परंतू याचा गैरफायदा रोड रोमियो उठविण्याचा प्रयत्न करतात. अशा टवाळखोर तरुणांची दहशत वाढत आहे. पोलिसांनी शाळा, महाविद्यालय परिसरात लक्ष देण्याची गरज आहे.
Web Title: Molested of a Married Woman by Driving the Vehicle Horizontally
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study