Ahmednagar | अहमदनगर: दोन सक्ख्या बहिणींना मारहाण करत विनयभंग (Molestation) केल्याची घटना नगर शहरात घडली आहे. याप्रकरणी आईच्या मुलीने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तवाब शेख बच्चू, दानिश शेख, जईद शेख (सर्व रा. बाबा बंगाली, चांदणी चौक, अहमदनगर), समीर शेख उर्फ फेगडा (रा. मुकुंदनगर, अहमदनगर) आणि अनोळखी चार ते पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी हे फिर्यादी यांच्या घरासमोरून दुचाकीवरून सारख्या चकरा मारत पीडितेला इशारे करत होते. याबाबत पीडितेने आरोपींना विचारले असता,‘मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, तू माझ्यासोबत चल’ असे आरोपीपैकी एक म्हणाला. त्याला पीडितेने नकार दिला असता आरोपीने शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.
त्यावेळी फिर्यादीची दुसरी मुलगी बाहेर आली असता आरोपीने तीला देखील शिवीगाळ करून लाथांनी मारहाण करत मोबाईल फोडला. त्यानंतर आरोपींनी घरामध्ये घुसून फिर्यादीचा मुलगा, जावई, बहिणीचा मुलगा यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. तोफखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Web Title: Molestation of two Sakhaya sisters