Home अहिल्यानगर अहिल्यानगर: खाऊ घेण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अहिल्यानगर: खाऊ घेण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Breaking News | Ahilyanagar: बेलवंडी पोलिस ठाणे हद्दीतील एका गावात दुकानात खाऊ घेण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना.

Molestation of a minor girl who had gone to get food

श्रीगोंदा | विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाणे हद्दीतील एका गावात दुकानात खाऊ घेण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी (दि. २८) दुपारी घडली. याबाबत बेलवंडी पोलिस ठाण्यात सदर दुकानदाराच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बबन गेणबा वाळके (वय ५०) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पीडित मुलगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेते. शनिवारी दुपारी शाळा सुटल्यावर घरी जाताना खाऊ घेण्यासाठी ती दुकानात गेली होती.

आसपास कोणी नाही हे पाहून दुकानदाराने तिच्याशी अश्लील चाळे केले. यावेळी सदर मुलीने स्वतःची सुटका करून घेत घरी गेली. घडलेला प्रकार तिने घरी सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने दाखल केलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Breaking News: Molestation of a minor girl who had gone to get food

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here