शिर्डी हत्याकांडातील आरोपींना मोक्का
Breaking News | Shirdi Crime: कर्तव्यावर जात असताना दोन आरोपींनी लुटमार करण्याचे उद्देशाने त्यांचा खुन केला होता.
शिर्डी : साईबाबा संस्थानमधील कर्मचारी सुभाष साहेबराव घोडे व नितीन शेजुळ हे शिर्डी येथे कर्तव्यावर जात असताना दोन आरोपींनी लुटमार करण्याचे उद्देशाने त्यांचा खुन केला होता. या दोन्ही आरोपींना मोक्का लावा, अशी ग्रामसभेत मागणी करण्यात आली होती. उपविभागीय अधिकारी शिरिष वमणे व पोलिस निरीक्षक रणजित गंलाडे यांनी याबाबत आरोपींना मोकका लावून मयताच्या कुटूंबाला दिलेला शब्द पुर्ण केला.
या घटनेबाबत शिर्डी पोलिस स्टेशनमध्ये रजिस्टर नंबर 53/2025 गुन्हा दाखल होता. तपासात राजु उर्फ शाक्या अशोक माळी व किरण ज्ञानदेव सदाफुले यांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले होते. आरोपींवरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम 1999 मधील वाढीव कलम लावण्याची परवानगी मिळणेबाबत प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र यांना तपास अधिकारी रणजित गलांडे यांनी सादर केला होता. त्याप्रमाणे विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी राजु उर्फ शाक्या अशोक माळी व किरण ज्ञानदेव सदाफुले यांचे विरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम सन 1999 चे कलम 3 (1) (ळ), 3 (2) व 3 (4) असे वाढीव कलम लावण्याबाबत परवानगी दिलेली आहे. त्याप्रमाणे सदरचे गुन्हयास दि.6 मार्च रोजी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम 1999 मधील वाढीव कलम लावलेले आहे. त्यामुळे मयताच्या कुटुंबांनी समाधान व्यक्त केले.
Web Title: Mocha for the accused in the Shirdi massacre