बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मनसे कार्यकर्त्याची हत्या
Breaking News | Mumbai Crime: मनसे कार्यकर्त्याची हत्या.
मुंबई: मुंबई पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरली आहे. मुंबईतील मालाड पूर्वेमध्ये मनसे कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळी मालाड पूर्वे येथे रेल्वे स्टेशनजवळ घडली आहे. आकाश माईन (वय २७ वर्ष) असं हत्या करण्यात आलेल्या मनसे कार्यकर्त्याचे नाव आहे. याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबईत आणखी एका राजकीय व्यक्तीची हत्या झाली आहे. मालाड पूर्व येथे दिंडोशी परिसरात मनसे कार्यकर्त्याची हत्या झाली आहे. रिक्षा चालक आणि स्थानिक फेरीवाल्यांकडून त्याची हत्या झाल्याचं सांगितलं जात आहे. आकाश माईन काल विजयादशमी दसरानिमित्त शनिवारी सायंकाळी नवीन गाडी खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी कट मारल्यामुळे रेल्वे स्टेशनजवळ त्याची एका रिक्षावाल्यासोबत बाचाबाची झाली.
वाद वाढल्यानंतर रिक्षा चालकाचे मित्र आणि स्थानिक फेरीवाल्यांनी घटनास्थळी जमून सुमारे १० ते १५ जणांनी मनसे कार्यकर्ता आकाशवर हल्ला केला. लाथा-बुक्क्यांनी केलेल्या मारहाणात तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ जवळच्या ट्रामा केअर रुग्णालयात दाखल केले. मात्र रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आकाश माईनचा मृत्यू झाला. या हल्ला प्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: MNS worker killed after Baba Siddiqui’s murder
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study