Home संगमनेर मनसेचा संगमनेरमधील उमेदवार फायनल, यांना असणार उमेदवारी

मनसेचा संगमनेरमधील उमेदवार फायनल, यांना असणार उमेदवारी

Maharashtra assembly elections 2024 | MNS Candidate List: 

assembly election MNS candidate in Sangamner final

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणुकीसाठी एकला चलोची भूमिका घेतली आहे. मनसेनं विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 32 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे राज ठाकरे यांनी भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांच्या विरोधात देखील मनसेनं उमेदवार दिला आहे. साईप्रसाद जटालवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेनं सहाव्या यादीपर्यंत 117 उमेदवार जाहीर केले आहेत.

संगमनेर मतदार संघासाठी योगेश सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मनसेची सहावी उमेदवार यादी खालीलप्रमाणे  :

नंदुरबार – वासुदेव गांगुर्डे, मुक्ताईनगर- अनिल गंगतिरे, सावनेर- घनश्याम निखोडे, नागपूर पूर्व- अजय मारोडे, कामठी- गणेश मुदलियार, अर्जुनी मोरगाव-भावेश कुंभारे, अहेरी- संदीप कोरेत, राळेगाव- अशोक मेश्राम, भोकर- साईप्रसाद जटालवार, नांदेड उत्तर- सदाशिव आरसुळे, परभणी- श्रीनिवास लाहोटी, कल्याण पश्चिम- उल्हास भोईर, उल्हासनगर- भगवान भालेराव, आंबेगाव- सुनील इंदोरे, संगमनेर-योगेश सूर्यवंशी, राहुरी- ज्ञानेश्वर गाडे (माऊली), नगर शहर- सचिन डफळ, माजलगाव- श्रीराम बादाडे,दापोली- संतोष अबगुल, इचलकरंजी- रवी गोंदकर, भंडारा-अश्विनी लांडगे, अरमोरी- रामकृष्ण मडावी, कन्नड- लखन चव्हाण, अकोला पश्चिम- प्रशंसा अंबेरे, सिंदखेडा- रामकृष्ण पाटील, अकोट- कॅप्टन सुनील डोबाळे , विलेपार्ले- जुईली शेंडे, नाशिक पूर्व -प्रसाद सानप, देवळाली- मोहिनी जाधव, नाशिक मध्य -अंकुश पवार, जळगाव ग्रामीण- मुकुंदा रोटे, आर्वी- विजय वाघमारे.

Web Title: assembly election MNS candidate in Sangamner final

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here