आ. तांबे हे मामाचे झाले नाही, तर ते भाजपचे कसे होतील- आ.खताळ
Breaking News | Sangamner: पदवीधर मतदारसंघात नाशिक अहिल्यानगर, जळगाव, धुळे नंदुरबार आदी जिल्हे येतात. तेथील अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित.
आश्वी : आ. सत्यजित तांबे हे पदवीधर मतदार संघातील आमदार आहे. ज्या भारतीय जनता पार्टीच्या तसेच महायुतीच्या जोरावर सत्यजित तांबे हे आमदार झाले. तुम्ही तुमच्या मामाचे झाले नाही तर तुम्ही भाजपाचे कसे होणार. पदवीधर मतदारसंघात नाशिक अहिल्यानगर, जळगाव, धुळे नंदुरबार आदी जिल्हे येतात. तेथील अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे.
आ. तांबे यांनी त्यामध्ये लक्ष घालावे. संगमनेर तालुक्यातील जनतेने ४० वर्षाच्या दहशतीचे झाकण उडवून देत भावी मुख्यमंत्रीचे स्वप्न बघणाऱ्यांना माजी आमदार केल्याचे आ. अमोल खताळ यांनी सांगितले. आर्चाय बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्याने संगमनेर तालुक्यातील पत्रकाराशी चर्चा करतांना आ. अमोल खताळ बोलत होते. आ. खताळ म्हणाले की, मी संगमनेर मतदारसंघातील २ लाख ८८ हजार मतदारसंघातील जनतेचा आहे. ज्या मतदारांनी मला मतदान केले त्याचे मी ऋणी आहे. तेसच ज्या मतदारांनी मला मतदान केले नाही, ते ही माझ्याच मतदारसंघातील आहे.
संगमनेरमध्ये माझ्या विषिय जे सभ्रम तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांनी यापेक्षा आपल्याला मतदारांनी का नाकारले यांचे कारणे शोधावी व आत्मपरीक्षण करावे. मला नाशिक, धुळे येथील पदवीधर मतदारसंघातील काही लोकांचे फोन आले होते. की आम्ही निवडुन दिलेले पदवीधराचे आमदार संगमनेर तालुक्यातील गल्ली बोळात जाऊन प्रश्न विचारीत आहे. आ. तांबे आमच्या भागात आल्यावर आम्ही त्यांनी तेथे विरोध करू, असे तेथील लोकांनी सांगितले. त्यामुळे आ. तांबे यांनी केवळ पदवीधर मतदारसंघा पुरतेच मर्यादीत रहावे, असेही आ. खताळ म्हणाले.
Web Title: MLA Tambe does not belong to Mama, how will it belong to BJP
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News