Home संगमनेर आमदार साहेब विखेंची गुलामी करण्यापेक्षा संगमनेरच्या हिताचा विचार करा

आमदार साहेब विखेंची गुलामी करण्यापेक्षा संगमनेरच्या हिताचा विचार करा

Breaking News | Sangamner Politics: वीज प्रश्नाच्या संदर्भाने साधे नियोजन ज्यांना करता येत नाही, त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करणे म्हणजे शुद्ध बालिशपणा आहे असा घनाघाती आरोप संगमनेर शहर काँग्रेसचे अध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केला.

MLA Saheb Vikhe, think about the interests of Sangamner

संगमनेर: तळहाताच्या फोडाप्रमाणे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी 40 वर्ष संगमनेर तालुक्याला सांभाळलेले आहे, म्हणूनच महाराष्ट्राच्या विकसित तालुक्यांमध्ये संगमनेरची गणना होते. अवघ्या तीन महिन्यात पालकमंत्र्यांच्या हातचे बाहुले झालेल्या आ. अमोल खताळ यांनी आपण विखे यांना नाही तर संगमनेरकरांना बांधील आहोत याचे भान बाळगले पाहिजे. वीज प्रश्नाच्या संदर्भाने साधे नियोजन ज्यांना करता येत नाही, त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करणे म्हणजे शुद्ध बालिशपणा आहे असा घनाघाती आरोप संगमनेर शहर काँग्रेसचे अध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केला.

दिवटे म्हणाले, आमदारांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे, आमदारांच्या आजूबाजूला असलेले टवाळखोर, तस्कर आणि खंडणी बहाद्दर आता हा तालुका चालवणार का? दहशत आणि दादागिरी करून राजकारण करणार का? स्व. भास्करराव दुर्वे, दत्ता देशमुख, बी जे खताळ पाटील, भाऊसाहेब थोरात, बाळासाहेब थोरात ही सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आमदारांना सांभाळता येत नसेल तर त्यांनी गप्प बसावे मात्र संगमनेरचा अपमान करू नये. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल कसा लागला हे संपूर्ण देशाला माहित आहे. त्यामुळे जी काही आमदारकी तुम्हाला मिळाली आहे तिचा आनंद घ्या, संगमनेरवर सूड उगवू नका. विकास कामे बंद पाडू नका आणि महत्त्वाचे म्हणजे टक्केवारीत अडकू नका. दादागिरी करणाऱ्यांना आणि गुंडांना पाठीशी घालू नका.

संगमनेर मध्ये विजेचा प्रश्न गंभीर झाला आहे. जिथे पूर्वी बारा तास पूर्ण दाबाने लाईट मिळायची तिथे अवघी चार-पाच तास लाईट मिळते. रोहित्र वेळेवर मिळत नाही, पाणी वाहून चालले आहे. या सर्व गोष्टींना फक्त आणि फक्त आमदारांचा नाकारतेपणाच कारणीभूत आहे.

आमदारांना संगमनेर तालुक्याशी काहीही घेणे देणे नाही पालकमंत्री सांगतील तसे ते वागत आहेत. दादागिरी आणि दमदाटी करून चुकीचे राजकारण करण्याचा प्रयत्न त्यांचा आणि त्यांच्या पिलावळीचा आहे. आढावा बैठकांमध्ये मुळात जनतेचे प्रश्न सोडवायचे असतात त्याला गती द्यायची असते चालू असलेली कामे बंद करायची नसतात. मात्र टक्केवारीच्या आशेने थेट पालकमंत्र्यांना बोलवून खंडणी वसुलीचा कार्यक्रम झाल्याचे आमचे स्पष्ट मत आहे.

आढावा बैठक म्हणजे अधिकाऱ्यांवर दादागिरी करून खंडणी उकळण्याचा अत्यंत घुणस्पद प्रकार होता. अनेक अधिकारी खाजगीत संगमनेर तालुक्यात वाढलेली टक्केवारी, खंडणी आणि दादागिरी याबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. चुकीच्या प्रवृत्ती आणि चुकीची माणसं सांभाळून संगमनेर तालुक्याचे नाव बदनाम करण्याचा घाट घातला जातो आहे. हे सर्व पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाने आणि आमदारांच्या सहमतीने सुरू आहे, असाही घनाघाती आरोप दिवटे यांनी केला.

Web Title: MLA Saheb Vikhe, think about the interests of Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here