अहमदनगर जिल्ह्यात आमदारच करोना पॉझिटिव्ह
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात करोनाचे मीटर हे वाढताना दिसून येत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात ३४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. काल सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात एका आमदाराचा समावेश आहे. जिल्ह्याचा करोनाबाधितांचा एकूण आकडा ५३३ वर पोहोचला आहे. तसेच शुक्रवारी ३७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात लोकप्रतिनिधी आमदारांनाच करोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. या आमदारांनी सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. या आमदाराने खबरदारी म्हणून स्वतः ला होम कोरांटाईन करून घेतले होते. त्यानंतर त्यांनी करोनाची तपासणी केली असता त्यांचा अहवाल काल सायंकाळी पॉझिटिव्ह आला आहे.
लोकप्रतिनिधी सोबत कार्यकर्त्यांची गर्दी असते. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे, सध्या हे लोकप्रतिनिधी उपचारासाठी दाखल झाले आहेत. स्थानिक प्रशासन लोकप्रतिनिधीच्या संपर्कातील कार्यकर्त्यांची माहिती घेत आहे. याधीही राज्यात मंत्र्यांना करोनाची लागण झाली असल्याचे समोर आले होते.
Website Title: MLA corona positive in Ahmednagar breaking