Home बीड अल्पवयीन विद्यार्थिनीला लॉजवर नेऊन अत्याचार, अन धमक्या…

अल्पवयीन विद्यार्थिनीला लॉजवर नेऊन अत्याचार, अन धमक्या…

Breaking News | Beed Crime: एका १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार (abused) केल्याचा धक्कादायक प्रकार.

minor student was taken to a lodge and abused and threatened

बीड: बीडच्या माजलगावमध्ये एका १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल तब्बल १५ दिवस उलटले, मात्र अद्यापही आरोपी मोकाटच आहे. आता या आरोपीने पीडितेच्या कुटुंबियांना केस परत घ्या, अन्यथा जीवे मारू अशा धमक्या देणे सुरू केलं आहे. त्यामुळे भेदलेल्या पीडितेच्या आई-वडिलांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे.

दुर्दैव म्हणजे आरोपी मोकाट असल्याने मुलीचं शिक्षण बंद करण्याची वेळ कुटुंबावर आलीय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबविणारे सरकारं आता या भाच्चीला सुरक्षा आणि न्याय देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नववीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना बीडच्या माजगाव पोलीस ठाणे हद्दीत ६ जून रोजी घडली होती.

अत्याराबाबत कोणाला सांगितलं तर जीवे मारेल, अशी धमकी सुद्धा आरोपीने पीडितेला दिली. त्यामुळे पीडित मुलीने याबाबत कोणाला काहीच सांगितले नाही. मात्र, शाळेत जाण्यास तिने सातत्याने नकार दिला. यावेळी आईने कारण विचारले असता पीडितेने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्याचवेळी आईने पीडित मुलीला घेऊन पोलीस ठाणे गाठत गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल होऊनही आरोपी अद्याप मोकाटच आहे. तो आम्हाला सातत्त्याने धमक्या देत आहेत. त्यामुळं मुख्यमंत्री यांनी लाडक्या बहिणीच्या भाचीला न्याय द्यावा, अशी हाक पीडितेला आईने दिली आहे. माझ्यावर अत्यावर एकाने केला पण लॉजवर साथ देणारे तिघेजण होते. एकाच रूममध्ये होते, असं पीडित मुलीने सांगितलं. यावरून सामाजिक कार्यकर्ते बाबुराव पोटभरे आक्रमक झाले असून आरोपीला अटक केली नाही तर थेट पोलीस ठाण्याला घेराव घालू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, याबाबत माजलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस धीरजकुमार बच्छा यांना विचारला असता. आरोपीला अटक करण्यासाठी आमच्या टीम पाठवल्या आहेत. कॉल डिटेल्स तपासली जात आहे. आरोपीने त्यांना धमकी दिल्याचे देखील पोलिसांनी कबूली दिली. लॉजवर देखील कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.

Web Title: minor student was taken to a lodge and abused and threatened

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here