अहिल्यानगर: दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने संपविले जीवन
Breaking News | Ahilyanagar: दहावीत शिकणाऱ्या १५ वर्षीय प्राची संदीप ढगे या विद्यार्थिनीने २८ जुलै रोजी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली.
पाथर्डी: पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथे दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने सोमवारी (दि. २८) सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्राची संदीप ढगे (वय १५) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. पाथर्डी पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्राचीने सोमवारी सकाळी सुमारे अकरा वाजता आपल्या घरी ओढणीच्या मदतीने गळफास घेतला. तिच्या कुटुंबात दोन बहिणी आहेत, त्यापैकी मोठी बहीण अकरावीत आणि लहान बहीण सहावीत शिकते. आत्महत्येच्या वेळी घरात कोणीच नव्हते, कारण तिचे आई-वडील मजुरीच्या कामासाठी शेतात गेले होते. सकाळी शाळेत गेल्यावर पोटदुखीची तक्रार करून प्राची घरी परतली होती. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Breaking News: minor student studying in class 10 ended her life