अल्पवयीन बहिणीवर भावाकडून वर्षभर अत्याचार, घृणास्पद प्रकार
Breaking News Pune Crime: एका तरुणाने आपल्याच अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना. बाळाला जन्म दिला, यानंतर ही घटना उघडकीस आली.
दौंड: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याठिकाणी एका तरुणाने आपल्याच अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपी भाऊ वर्षभर पीडितेचं लैंगिक शोषण करत होता. हा धक्कादायक प्रकार लपवण्यासाठी भावाने बहिणीवर दबाव टाकला होता. मात्र या लैंगिक संबंधातून पीडित मुलगी गर्भवती राहिली आणि तिने बाळाला जन्म दिला, यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी दौंड तालुक्यातील गिरीम येथील रहिवासी आहे. तिच्यावर वायरलेस फाटा आणि पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा येथे राहणाऱ्या दोन आरोपींनी वारंवार अत्याचार केला आहे. धायरी येथे राहणारा आरोपी हा पीडित तरुणीचा नात्याने चुलत भाऊ लागतो. शिवाय पीडित मुलगी अल्पवयीन आहे, हे माहीत असूनही आरोपींनी पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केले आहेत.
यातील एका आरोपीचा दौंड तालुक्यातील गिरीम हद्दीतील वायरलेस फाटा येथे फोटो स्टुडिओ आहे. या स्टुडिओत आणि पीडितेच्या घरी आरोपींनी पीडितेवर लैंगिक अत्याचार केला आहे. मार्च 2024 ते जून 2024 दरम्यान हा अत्याचार सुरू होता. दोन्ही नराधमांकडून वर्षभर पीडितेला आपल्या वासनेचा शिकार बनवलं जात होतं.
पीडित मुलगी अल्पवयीन आहे, हे माहीत असूनही नराधम आरोपी जबरदस्तीने तिच्याशी शरीरिक संबध ठेवत होते. यातून पीडित मुलगी गर्भवती देखील राहिली. तसेच या अत्याचारातून पीडितेला एक मुलगीदेखील झाली. मात्र घडलेला प्रकार कोणाला सांगितला, तर पीडितेला आणि तिच्या बहीणीला जीवे मारणेची धमकी या नराधमांनी दिली, असं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणी दौंड पोलीसांनी नराधमांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दोन्ही आरोपींना बारामती विशेष न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरक्षक युवराज घोडके हे आहेत.
Web Title: Minor sister abused by brother for a year
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News