बीड जिल्हा हादरला! अल्पवयीन मुलीला घरातून फरफटत ओढत उसाच्या शेतामध्ये सामुहिक बलात्कार
Gang Rape: मुलीला घरातून फरफटत ओढत शेजारील उसाच्या शेतामध्ये नेऊन तीन नराधम तरुणांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना.
बीड: शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या मजुराच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक केल्याची धक्कादायक घटना समोर आली. आई- वडील कामाला गेल्याची संधी साधत घरातून फरफटत ओढत शेजारील उसाच्या शेतामध्ये नेऊन तीन नराधम तरुणांनी आळीपाळीने बलात्कार केला. दोन दिवसांपूर्वीच पोटच्या मुलीवर नराधम बापाने बलात्कार केल्याची घटना ताजी असताना पुन्हा या सामूहिक बलात्काराच्या घटनेने बीड जिल्हा हादरला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंठा तालुक्यातील एक कुटुंब दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलुरा गावातील शेतकऱ्याच्या शेतावर कामाला आहे. शुक्रवारी सकाळी आई– वडील शेतात कामाला गेल्याने त्यांची १७ वर्षीय पीडित मुलगी घरी एकटीच होती. ही संधी साधत आरोपी बाळू उर्फ महादेव सुधाकर फपाळने पीडित मुलीला शेजारील उसाच्या फडात फरफटत ओढत नेले. यानंतर तिथे तिच्यावर विजय दशरथ फपाळ, अमोल प्रभाकर फपाळ, अक्षय अर्जुन फपाळ या तिघांनी आळीपाळीने बलात्कार केला.
Earn Money online | फेसबुक वरून कसे पैसे कमवितात | How to earn money from facebook in Marathi
या दरम्यान एका महिलेने सामुहिक अत्याचार होत असताना पीडित मुलीचे नग्न फोटो काढले. या घटनेमुळे दिंद्रुड परिसरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अल्पवयीन पीडित मुलीच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलिस ठाण्यात एका महिलेसह महादेव फपाळ, विजय फपाळ, अमोल फपाळ आणि अक्षय फपाळ यांच्यावर बाललैंगिक अत्याचार ॲट्रॉसिटीनुसार गुन्हे दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना अटक करण्यात आली आहे.
जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation. भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC. सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.
Web Title: minor girl was dragged from her house and gang-rape in a sugarcane field
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App