Home क्राईम संतापजनक! अल्पवयीन मुलीला बिकिनीवर ऑडिशन द्यायला सांगितलं अन् लैंगिक अत्याचार केला

संतापजनक! अल्पवयीन मुलीला बिकिनीवर ऑडिशन द्यायला सांगितलं अन् लैंगिक अत्याचार केला

Pune Crime News: ऑडिशन घेण्याच्या बहाण्याने 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार (sexually assaulted) केल्याची घटना.

minor girl was asked to audition in a bikini and sexually assaulted

पुणे: एका प्रसिद्ध उद्योजकाने ऑडिशन घेण्याच्या बहाण्याने 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. चाकण परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी उद्योजकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार उद्योजकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र दगडू गायकवाड असं आरोपी उद्योजकाचं नाव आहे. गायकवाड हा पीडित मुलीच्या घरी आला होता. त्याने 13 वर्षीय मुलीला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचं आमिष दाखवलं. त्यानंतर मुलीचं ऑडिशन घ्यायचं आहे, असं सांगून मुलीच्या आई-वडिलांना घराबाहेर जाण्यास सांगितलं. आई-वडील घराबाहेर गेल्यानंतर ऑडिशन घेण्याच्या बहाण्याने मुलीला कपडे काढायला सांगितले. मुलगी लहान असल्याचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर या संदर्भात कोणाला सांगितलं तर मारुन टाकेन, अशी धमकीही दिली. अत्याचार करुन आरोपी घरातून निघून गेला.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

आरोपी घराबाहेर गेल्यानंतर आई-वडील घरात आले त्यावेळी मुलगी घाबरलेली दिसली. मुलीने झालेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी थेट पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पसार झाला असून पोलीस शोध घेत आहे.

Web Title: minor girl was asked to audition in a bikini and sexually assaulted

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here