कॅफेमध्ये नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार, कॉफी पिण्याच्या बहाण्याने….
Breaking News | Kolhapur Crime: बंद कॉफी कॅफेमध्ये नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना.
गडहिंग्लज : कॉफी पिण्याच्या बहाण्याने बंद कॉफी कॅफेमध्ये नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत महाविद्यालयीन तरुणाला गडहिंग्लज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शिवराज विजय देसाई (रा. दुंडगे, ता. गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे. पीडित मुलगी दीड महिन्याची गर्भवती असून, संबंधित कॅफे चालकाविरुद्धही गुन्हा दाखल करणार आहोत, असे पोलिसांनी सांगितले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सतरा वर्षांची पीडित मुलगी व संशयित आरोपी शिवराज हे दोघेही येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेतात. त्यातूनच त्यांची ओळख झाली असून, दोघेही एकमेकांचे मित्र आहेत. ५ मे २०२४ रोजी शिवराज याने कॉफी घेऊ या, असे सांगून पीडित मुलीला शहरातील कडगाव रोडवरील ‘द कॅफे कनेक्शन’मध्ये नेले.
त्याने जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यातूनच ती दीड महिन्याची गर्भवती राहिली आहे. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक गजानन सरगर अधिक तपास करीत आहेत.
Web Title: minor girl was abused by being taken to a cafe
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study