अहमदनगर: अल्पवयीन मुलीला पळवून नेवून तिच्यावर अत्याचार
Ahmednagar | अहमदनगर: अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार (sexually abused) केल्याचा प्रकार समोर आला आहे. तोफखाना पोलिसांनी पिडीत मुलीची सुटका करून पळवून नेणाऱ्या मुलाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अपहरण व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पिडीत मुलीचा जबाब नोंदविला आहे.
नगर शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने लग्नाचे आमिष दाखवून त्याच उपनगरातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते. पिडीत मुलीच्या पालकांनी ११ जून रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अपहरण करणाऱ्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी पिडीत अल्पवयीन मुलीचा शोध घेत मुलीची सुटका करण्यात आली असून मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
Web Title: a minor girl was abducted and sexually abused