अहमदनगर ब्रेकिंग: अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार, तरुणाला अटक
Ahmednagar rape Case: अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक.
अहमदनगर: आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. भिंगार कॅम्प पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुलीची सुटका करीत पळवून नेऊन अत्याचार करणार्या तरुणाला अटक केली आहे. योगेश कचरू गायकवाड (वय 20 रा. फुलसौंदर मळा, बुरूडगाव रोड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नगर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी एका युवकाने पळवून नेले होते. यासंदर्भात 1 नोव्हेंबर रोजी पीडित मुलीच्या आईने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक एस.एम. मुगडे या करीत होत्या. पोलिसांकडून मुलीसह पळवून नेणार्या युवकाचा शोध सुरू होता. मुलीला योगेश गायकवाड याने पळवून नेले असून सदरची मुलगी आष्टा (जि. सांगली) येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक (नगर शहर) अनिल कातकाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मुगडे यांच्या पथकातील पोलीस अंमलदार रेवणनाथ दहिफळे, रमेश दरेकर यांनी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, बावसी, गोटखिंड, येडे निपाणे तसेच आष्टा पोलीस ठाणे हद्दीत शोध घेतला असता पथकाला मुलगी व मुलगा दोन्ही गोटखिंड (ता. वाळवा, जि. सांगली) येथे आढळून आले.
पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले असून पळवून नेऊन अत्याचार करणारा योगेश गायकवाड याच्याविरूध्द भादंवि कलम 376, पोक्सो, अॅट्रोसिटी आदी कलमाव्दारे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास शहर पोलीस उपअधीक्षक कातकाडे करीत आहेत.
Web Title: minor girl was abducted and Rape, the youth was arrested
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App