Home अहिल्यानगर अहिल्यानगर: अमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळविले

अहिल्यानगर: अमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळविले

Breaking News  Ahilyanagar Crime: एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस एका इसमाने कशाचेतरी अमिष दाखवून तिचे अपहरण केल्याची घटना.

Minor girl kidnapped by pretending to be Amish

अहिल्यानगर : नगर तालुक्यातील वाळकी गावाच्या परिसरातून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस एका इसमाने कशाचेतरी अमिष दाखवून तिचे अपहरण केल्याची घटना १३ मार्च रोजी घडली आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची अल्पवयीन मुलगी कुटुंबियांसमवेत घरात झोपलेली असताना १३ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास ती घरातून बेपत्ता झाली. नातेवाईकांनी तिचा शोध वाळकी परिसरात तसेच नातेवाईकांकडे सर्वत्र शोध घेतला असता ती कुठेही मिळून आली नाही. त्यामुळे तिचे एका इसमाने अपहरण केले असल्याची तक्रार मुलीच्या आईने नगर तालुका पोलिस ठाण्यात दिली. या तक्रारीवरुन पोलिसांनी एका इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे हे करीत आहेत.

Web Title: Minor girl kidnapped by pretending to be Amish

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here