Home अहमदनगर अहमदनगर: प्रियकराने फसविल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या, चिठ्ठीमुळे उलगडा

अहमदनगर: प्रियकराने फसविल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या, चिठ्ठीमुळे उलगडा

Ahmednagar Shrigonda News: दुसऱ्या मुलीशी प्रेमसंबंध प्रस्थापित केल्याच्या रागातून एका अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide).

minor girl commits suicide after being cheated by her boyfriend

श्रीगोंदा : प्रेमविवाह करूनही प्रियकराने पुन्हा दुसऱ्या मुलीशी प्रेमसंबंध प्रस्थापित केल्याच्या रागातून एका अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. २४ जानेवारी रोजी श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथे ही घटना घडली. याप्रकरणी आरोपी करण कुंदाडे (रा. भानगाव ता. श्रीगोंदा) याच्या विरोधात श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत अल्पवयीन मुलीने दोन वर्षांपूर्वी करण कुदांडे याच्याशी प्रेमविवाह केला होता. परंतु, तो पुण्यात गेल्यानंतर त्याचे दुसऱ्या मुलीशी प्रेमसंबंध जुळले. ही गोष्ट सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. मयत मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्या चिठ्ठीमुळे या घटनेचा उलगडा झाला आहे. श्रीगोंदा पोलिस पुढील तपास करीत आहेत

Web Title: minor girl commits suicide after being cheated by her boyfriend

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here