Home क्राईम नात्याला काळिमा:  अल्पवयीन मुलीवर वडील, आजोबा, काकांकडून ६ वर्ष अत्याचार

नात्याला काळिमा:  अल्पवयीन मुलीवर वडील, आजोबा, काकांकडून ६ वर्ष अत्याचार

Pune Abused Case:  पुण्यात आजोबा, चुलता आणि वडिलांकडून एका १७ वर्षीय मुलीवर सलग सहा वर्षांपासून अत्याचार.

Minor girl abused by father, grandfather, uncle for 6 years

पुणे: विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पुण्यात आजोबा, चुलता आणि वडिलांकडून एका १७ वर्षीय मुलीवर सलग सहा वर्षांपासून अत्याचार केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पीडित मुलीने कॉलेजमधील समुपदेशन तासाच्यावेळी आपल्यासोबत घडलेला प्रकार कथन करून उघडकीस आणला आहे.

पीडित मुलीने सांगितलेला घटनाक्रम ऐकून समुपदेशकांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी या सर्व प्रकाराची माहिती तातडीने पोलिसांना दिली. पीडित मुलीचे तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी आजोबा, काका आणि वडिलांवर अत्याचाराचा गुन्हा  दाखल केला आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील मोलमजुरी करतात. पीडितेच्या घरची परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांनी फिर्यादीला उत्तर प्रदेशातील आपल्या मुळ गावी राहायला पाठविले. २०१६ ते २०१८ या काळात ही मुलगी साधारण १२ -१३ वर्षाची असताना मुळगावी तिच्या चुलत्याने तिला दमदाटी करुन एक वर्षभर तिच्याबरोबर वारंवार अत्याचार केले.

यावेळी ७० वर्षांच्या आजोबांनी देखील तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले. एप्रिल २०१८ मध्ये पीडिता पुण्यात परतल्यानंतर तिने या अत्याचाराची माहिती चिठ्ठी लिहून वडीलांना कळविली. मात्र, वडीलांनी सुद्धा तिच्यावर अत्याचार केले. गेल्या अनेक वर्षांपासून पीडिता हे अत्याचार सहन करत होती. दरम्यान, पीडितेने तिच्या कॉलेजमधील एका कार्यक्रमात आपल्यासोबत घडलेला घटनाक्रम सांगितला.

पीडितेसोबत घडलेली घटना ऐकून समुपदेशकानाही धक्का बसला. त्यांनी या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींविरोधात विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी नराधम बापास अटक केली आहे.

Web Title: Minor girl abused by father, grandfather, uncle for 6 years

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here