संगमनेरातून अल्पवयीन मुलगा चार महिन्यांपासून बेपत्ता
Breaking News | Sangamner: जानेवारी महिन्यात अज्ञात इसमाने दोन अल्पवयीन मुलांना पळवून नेले.
संगमनेर: शहरातील सिद्धार्थ बोर्डिंग स्कूल येथून जानेवारी महिन्यात अज्ञात इसमाने दोन अल्पवयीन मुलांना पळवून नेले आहे. यातील एक अकरावर्षीय मुलगा मिळून आला आहे, मात्र चौदावर्षीय मुलाचा चार महिने उलटून गेल्यानंतर अद्यापही शोध लागलेला नाही. त्यासाठी पोलिसांनी आवाहन केले आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की सिद्धार्थ बोर्डिंग स्कूल येथून जानेवारी महिन्यात अज्ञात इसमाने आर्यन सुधाकर गांगड (वय ११) व अक्षय कैलास गांगड (वय १४) या दोन मुलांना अज्ञात कारणासाठी पळवून नेले.
महत्वाचे: नवनवीन फिचर मिळविण्यासाठी आजच आपला अॅप अपडेट करा. येथे क्लिक करा.
याप्रकरणी स्कूलचे अमोल रोकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरु असताना आर्यन गांगड मिळून आला आहे. मात्र, अक्षय गांगड अद्याप मिळून आलेला नाही. तो शरीराने सडपातळ, उंची ५ फूट ६ इंच, रंग सावळा, नाक सरळ, अंगात काळ्या रंगाची साधी विजार व पायात चप्पल असा पेहराव आहे. तरी अशा वर्णनाचा मुलगा दिसून आल्यास तत्काळ संगमनेर शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक फराहनाज पटेल यांनी केले आहे.
Breaking News: Minor boy missing from Sangamner for four months