Home अहमदनगर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात कोरोना पॉझिटिव्ह

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात कोरोना पॉझिटिव्ह

Minister Balasaheb Thorat corona Positive

अहमदनगर | Ahmednagar News Live: माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यातच आता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात देखील कोरोना पॉझिटिव्ह (Covid Positive) आले आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील दोन आज व एका माजी मंत्र्याला कोरोनाने घेरल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीच्या लग्नसमारंभास देखील उपस्थिती लावली होती. त्यामुळे या लग्नात इतरही अनेक नेत्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे.

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी ट्विटर माहिती दिली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी.

Web Title: Minister Balasaheb Thorat corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here