अहिल्यानगर: मिनी बस पलटी, १० प्रवासी जखमी; चौघांची प्रकृती चिंताजनक
Breaking News | Ahilyanagar Accident: बसमध्ये प्रवासी घेऊन जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे बस रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली.
पाथर्डी तालुक्यातील वेळी शिवार येचील कल्याण-विशाखापट्टणम (निर्मल) राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी पहाटे दोन ते तीनच्या सुमारास मिनीबस (टेम्पो ट्रॅव्हलर क्र. एम एच २० डी डी ०९६१) चा अपघात झाला, पाथर्डीकडे येत असलेल्या या बसच्या चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. यात १० प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील चार जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलवण्यात आले आहे.
पाथर्डीतालुक्यातील येळी ते भुते टाकळी दरम्यान येळी गावच्या शिवारात सोमवारी पहाटेच्या सुमारास अपघात घडला. मिनीद्यसमध्ये प्रवासी घेऊन जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला, त्यामुळे बस रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. घटनेची माहिती मिळताच प्रवाशांना वाहनाबाहेर काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने धाव घेतली.
अपघातात जखमी झालेले प्रवासी
वरमाला भगवान पवार (वय ७०), आरती दिनेश मालोटकर (वय ४०), रुद्र अनिल पिसाळ (वय १९), अनन्या विजय म्हस्के (वय १७), कुणाल संजय मिसाळ (वय २४१, कविता संतोष पवार (वय ३५), पौर्णिमा संदीप शिंदे (वय ४२), शौर्य संतोष पवार (वय ११), संस्कृती अनिल पिसाळ (वय १७), आदिती कुणाल पिसाळ (वय १८). यापैकी वरमाला पवार, आरती मालोटकर, रुद्र पिसाळ आणि अनन्या म्हस्के या चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना तत्काळ अहिल्यानगर येथे हलविण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
Breaking News: Mini bus overturns, 10 passengers injured