अकोले पोलीसांची कामगिरी: मिल्कींग मशिन व कुट्टी मशिन इंजिन चोरी करणारी टोळी जेरबंद

Akole | अकोले: मिल्कींग मशिन व कुट्टी मशिन इंजिन चोरी (Theft) करणारी टोळी गजाआड करण्यात अकोले पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी 1 लाख 39 हजार रुपयांचे मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता सपोनि मिथुन घुगे यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मागील काही दिवसांपासुन अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मिल्कींग मशीन तसेच चारा कापण्याचे यंत्राचे (कुट्टी मशीन ) इंजिन चोरी जाण्याचे प्रकार वाढले होते. दिनांक 06.01.2022 रोजी रात्री चैत्यनपुर ता अकोले परिसरातुन तक्रारदार यांची 20,000 रुपये किमंतीच मिल्कीग मशिन चोरी गेलेबाबत अकोले पोलीस स्टेशन तक्रार प्राप्त झाल्यानंतर तक्रारदार यांची तात्काळ तक्रार नोंदवुन घेवुन अकोले पोलीस स्टेशनला गुरनं 12/2022 भा.द.वि कलम 379 प्रमाणे दाखल करण्यात आला होता. सदरचा प्रकार सातत्याने घडत असल्याने वरिष्टांचे सुचना व मार्गदर्शना खाली मालाविरुदधच्या गुन्ह्यांना प्रतिबंध होणेकरीता नाकाबंदी, कोंम्बीग ऑपरेश, मालाविरुदध चोरी करणाऱ्या आरोपींचे राहते घरी अचानक भेट अशा प्रकारच्या कारवाया नियमीत सुरु असताना सपोनि मिथुन घुगे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वर नमुद चोरी गेलेले मिल्कींग मशिन हे 1) तुषार बद्रीनाथ गवांदे 2) बबन सयाजी मांदळे दोन्ही राहणार चैत्यनपुर ता अकोले हे मिळुन आल्याने त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असुन त्यांचे साथीदारा बाबत विचारपुस केली असता त्यांनी 3 )मयुर रामदास महाले, 4) दौलत साहेबराव महाले दोन्ही रा बेलापुर ता अकोले यांचे नावे कळवुन यांचे मदतीने चोरी केल्याची कबुली दिल्याने वरील चारही इसमांना नमुद गुन्ह्यात अटक करुन त्यांना मा.न्यायालयासमोर हजर करुन त्यांची दिनांक 11.05.2022 रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड घेवुन त्यांना अटक करुन मा. न्यायालयात हजर केले असता त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेवुन त्यांचेकडे तपास केला असता त्यांचे कब्जातुन 1 )20,000/- रुपये किमंतीचे स्वंयचलित मिल्कींग मशिन (दुध काढण्याचे मशिन) 2)24,000/- रुपये किमंतीचे 4 कुट्टी मशीनचे इंजिन तसेच सदर चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या 3)50,000/- रुपये किमंतीची बजाज प्लटिना मोटार सायकल नंबर एम एच 17 सी एस 2836 4)45,000 रुपये किमंतीच स्पेंडर मोटार सायकल नंबर एम एच 17 सी पी 6343 मोटार सायकल नंबर एम एच असा एकुण 1,39,000/- रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा अधिक तपास अकोले पोलीस करीत असुन सदर आरोपीं यांचेकडुन अकोले पोलीस स्टेशन हद्दीत व परिसरात चोरी गेलेल्या गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता आहे.
सदर आरोपी विरुदध अकोले पोलीस स्टेशनला खालील गुन्हे दाखल आहे.
1) अकोले पोलीस स्टेशन जि अ.नगर गुरनं 12/2022 भा.द.वि कलम 379 प्रमाणे
2) अकोले पोलीस स्टेशन जि अ.नगर गुरनं 200/2022 भा.द.वि कलम 379 प्रमाणे
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील सो व मा. अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर मॅडम व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल मदने यांचे मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि मिथुन घुगे, पोउपनिरी भुषण हांडोरे,व अकोले पोलीस स्टेशन नेमणुकीचे पोना किशोर तळपे, पोना विठ्ठल शेरमाळे, पोकॉ सुहास गोरे, पोकॉ सुयोग भारती, पोकॉ अविनाश गोडगे, पोकॉ आत्माराम पवार, यांनी केली असुन पुढील तपास पोना किशोर तळपे व पोना विठ्ठल शेरमाळे हे करीत आहे.
Web Title: Milk machine and kutti machine engine theft gang arrested Akole
















































