अहमदनगर जिल्ह्यातील या तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के
Ahmednagar | Sangamner | संगमनेर: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील बोटा, घारगाव व पठार भागातील गावांत बुधवारी सकाळी ८ वाजून ५८ मिनिटांच्या सुमारास भूगर्भातील हालचालींचे सौम्य स्वरूपाचे धक्के (Mild tremors) नागरिकांना जाणविले. या धक्क्यांमुळे परिसरातील नागरिकांत भीती निर्माण झाली आहे.
मात्र याबाबत नाशिक येथील भूकंपमापन यंत्रावर याची नोंद झाली नसल्याचे भूवैज्ञानिक शास्त्रज्ञ चारुलता चौधरी यांनी माहिती दिली. कोरोनाचे संकट आणि घरात भूकंपाची यामुळे भीतीदायक अवस्था निर्माण झाली आहे.
Web Title: Mild tremors in this taluka of Ahmednagar