अटल बिहारी वाजपेयी पंचतत्वात विलीन
नवी दिल्ली: माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी सायंकाळी निधन झाले. त्यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी दिल्लीतील निवासस्थाणातून भाजपा मुख्यालयात नेण्यात आले. भाजपा मुख्यालयात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उप राष्ट्रपती व्यंकया नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमित शाह, लालकृष्ण आडवाणी, राजनाथ सिह , कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी, अध्यक्ष राहुल गांधी, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आदी नेत्यांनी वाजपेयींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
दुपारी दोनच्या सुमारास अटल बिहारी वाजपेयींच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. अंत्ययात्रेत विविध राजकीय पक्षातील नेत्यांसह लाखो चाहते सामील झाले होते. या पार्श्वभूमीवर बंदोबस्त हि वाढविण्यात आला होता.
You May Also Like: Shraddha Kapoor Upcoming Movies
अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर दिल्लीतील राजाघाटावरील राष्ट्रीय स्मृती स्थळावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अटल बिहारी वाजपेयी अविवाहित असल्याने त्यांच्या मानस पुत्रीने त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. दरम्यान कवी मनाचे कट्टर देशभक्त सर्वमान्य नेता सत्तेत असतानाही विरोधकानाही सन्मान देणारा व विरोधात असतांना विरोधकांची भूमिका देशहितासाठी चोख बजावणारा अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी आपल्या आयुष्यात निभावल्या. राजकारण करत असतांना भ्रस्टाचार अथवा असभ्यता असा एकही दाग न लागू देणारा, विरोधकानी त्यांच्यावर एकही प्रश्न उपस्थित न केलेल्या अशा या महान नेत्याला आज संपूर्ण देश मुकला आहे. त्यामुळे सर्वच स्थरातून वाजपेयी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.