Home अहिल्यानगर अहिल्यानगर: मतिमंद मुलीवर अत्याचार; भाकपचा नेता गजाआड

अहिल्यानगर: मतिमंद मुलीवर अत्याचार; भाकपचा नेता गजाआड

Breaking News | Ahilyanagar Crime: शेवगाव पोलिसांनी मुंबईतून केली अटक.

Mentally retarded girl abused CPI leader Gajaad

शेवगाव : लग्नाचे आमिष दाखवून मतिमंद मुलीवर अत्याचार करणारा भाकप राज्य कौन्सिल सदस्य संजय नांगरे याला शेवगाव पोलिसांनी मंगळवारी मुंबईतून अटक केली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

याप्रकरणी पीडित मतिमंद मुलीच्या बहिणीच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नांगरे याने लग्नाचे आमिष दाखवून १० मे रोजी पीडितेवर अत्याचार केला होता. याप्रकरणी १५ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला नांगरे याच्या विरोधात विनयभंग, अनु, जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आदी कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, पीडितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आल्यानंतर आरोपीविरोधात वाढीव कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, विनयभगांचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नांगरे फरार झाला होता. शेवगाव पोलिसांनी त्याला २६ मे रोजी मुंबई येथील दादर पोलिस ठाणे हद्दीतून ताब्यात घेत मंगळवारी अटक केली.

Breaking News: Mentally retarded girl abused CPI leader Gajaad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here