विवाहितेची हातावरची मेहंदी देखील पुसली नाही तेच तरुणीची गळफास घेत आत्महत्या
हिंगोली | Hingoli : विवाह होवून अवघे १० दिवसच झाले, हातावरची मेहंदी देखील पुसली नव्हती. यापुर्वीच विवाहीत तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची कळमनुरी तालुक्यातील मौजा गावात ही अत्यंत धक्कादायक घटना घडली सासरच्या मंडळीकडून आर्थिक व मानसिक छळ होत असल्याने तरुणीची गळफास घेतला.
हिंगोलीत कौटुंबिक हिंसाचाराने विवाह सोहळ्याच्या दहाव्या दिवशी १९ वर्षीय नवविवाहितेचा जीव घेतला आहे. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील मौजा गावात ही अत्यंत धक्कादायक घटना घडली असून, सासरच्या मंडळीकडून आर्थिक व मानसिक छळ होत असल्याने या नवविवाहित तरुणीने संसाराची गोड स्वप्ने रंगवण्याआधीच गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे.
या घटनेप्रकरणी विवाहितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून बासंबा पोलीस ठाण्यात विवाहितेच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सासू, सासरे व पती विरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला. त्यांना अटक करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Web Title: Mehndi on the hands of a married woman Suicide