Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग! मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

अहमदनगर ब्रेकिंग! मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

Breaking News | Ahmednagar: लोणी प्रवरा कॉलेजमधील मेडिकलच्या विद्यार्थ्याचा पवना धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना.

Medical college student drowned in water

अहमदनगर: पवना धरण परिसरात दुखद घटना समोर आली आहे. सुट्टी असली की  फिरायला जायचं बेत करतो. पण अनेकदा जिथे फिरण्यासाठी जातोय, त्या ठिकाणाची सुरक्षिततेच्या दृष्टीने चौकशी करत नाही. त्यामुळे अशा आपल्या जीवावर बेतत असतात. अशीच एक घटना घडली आहे.

26 जानेवारीच्या सुट्टीमुळे अनेकांनी बाहेर फिरण्यासाठी जाण्याचं नियोजन केलं होतं, असंच नियोजन अहमदनगरमधील मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी देखील केलं होतं. सुमारे 15 विद्यार्थी फिरण्यासाठी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पवना धरण परिसरात आले होते. पण, हेच त्यांच्या जीवावर बेतलंय. सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.

मावळच्या पवना धरण परिसरातील ठाकुरसाई गावाच्या हद्दीमध्ये टेंट परिसरात पर्यटनासाठी आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील लोणी प्रवरा कॉलेजमधील मेडिकलच्या विद्यार्थ्याचा पवना धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. . मनिष शंकर शर्मा असे या मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे.

26 जानेवारीला पंधरा वर्गमित्र पर्यटनासाठी मावळ तालुक्यातील पवनाधरणाच्या परिसरात आले होते. पंरतु त्यामधील चार विद्यार्थी पवनाधरणाच्या पाण्यात भिजण्याचा आंनद घेण्यासाठी पाण्यात गेले. परंतु त्यांना पाण्यातील खोलीचा अंदाज आला नाही. पाण्यात उतरल्यानंतर त्यांच्यातील दोनजण पाण्यात बुडू लागले. तेव्हा त्यांच्या सोबत असलेल्या इतर मित्रांनी आरडाओरडा केला. त्यामुळं स्थानिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आदित्य सचिन बुंदले याला वाचविण्यात यश आलं. मात्र, मनिष शंकर शर्मा याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तेव्हा लोणावळा ग्रामीण पोलीस तिथे पोहोचले. पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: Medical college student drowned in water

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here