विनयभंगाचा दाखल गुन्हा मागे घेऊन प्रकरण मिटवण्यासाठी खंडणी मागितल्याप्रकरणी एका शिक्षिकेस कोठडी
विनयभंगाचा दाखल गुन्हा मागे घेऊन प्रकरण मिटवण्यासाठी १५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी एका शिक्षिकेस कोठडी
उस्मानाबाद : येथील तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्याविरोधात विनयभंगाचा दाखल गुन्हा मागे घेऊन प्रकरण मिटवण्यासाठी १५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी एका शिक्षिकेस (मोबाइल टीचर ) शुक्रवारी (२४) पोलिसांनी देगलुर (जि. नांदेड) येथुन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शिंदे यांच्या न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
You May Also Like: Deepika Padukone Ranveer Singh Marriage Date
उस्मानाबाद जिल्हा परिषदचे तत्कालीन शिक्षणाधिकारी (प्रा.) यांच्याविरोध्दात विनयभंगाचा गुन्हा नोंद न करण्यासाठी खंडणीची मागणी करुन रक्कम स्वीकारल्याप्रकरणी शिक्षिका व राहुल रमन नलावडे (२६ रा. शेलगाव, ता.बर्शी) यांच्याविरोध्दात शहर पोलिस ठाण्यात गत ३ महिन्यांपुर्वी खंडणीच्या गुन्हाची नोंद झाली होती. शिक्षणाधिकाऱ्यांविरोध्दात विनयभंगाचे प्रकरण मिटवण्यासाठी राहुल हा अन्य एका सहकाऱ्यासोबत शिक्षिकेस भेटायला गेला होता. तेथे त्याने पैसे देऊन विनयभंगाचे प्रकरण मिटविण्याची डील केली.
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.