Home नंदुरबार दोन चिमुकल्यांसह मातेची विहीरीत उडी

दोन चिमुकल्यांसह मातेची विहीरीत उडी

Breaking News | Nandurbar Suicide: दोघा चिमुरड्यांसह मातेने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना.

Suicide Matechi Vihirit Udi with two chimukalyans

नंदुरबार : वावद येथे दोघा चिमुरड्यांसह मातेने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेमुळे खळबळ उडाली असून कौटुंबिक वादातून महिलेने चिमुकल्यांसह आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. ममता गणेश हरदास (२५) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी ममता हरदास यांनी वावद शिवारातील एका शेतात विद्या गणेश हरदास (४) व साई गणेश हरदास (२) या चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेतली. पाणी खोल असल्याने काही क्षणात तिघांचा बुडून मृत्यू झाला.

पती व सासूच्या ज्याचाला कंटाळून महिलेने चिमुकल्यांसह आत्महत्या केल्याची माहिती समोर आली असून मयताच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पती व सासू विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, ग्रामस्थांनी तिघांना बाहेर काढून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. याठिकाणी ममता, विद्या आणि साई या तिघांना मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात मयताच्या पती गणेश प्रकाश हरदास (चित्रकथे) रा. वावद ता. नंदुरबार यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नंदुरबार तालुक्यातील वावद येथे ममता यांनी विद्या आणि साई या दोघा बालकांसह आपल्या आयुष्याची अखेर केली. या प्रकरणी ममताच्या आईच्या यांच्या फिर्यादीवरून मयताचा पती गणेश प्रकाश हरदास व सासू मुक्ताबाई प्रकाश हरदास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. यात म्हटले आहे की, पती व सासू मोटरसायकल घेण्यासाठी 30 हजार रुपये माहेरवरून घेऊन यावे यासाठी मुक्ताबाई प्रकाश हरदास तिला त्रास देत. तसेच, मोठ्या बहिणीला फोन का लावते असे बोलून मारहाणही करत असत. तसेच तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत. या जाचाला कंटाळून ममताने मुलांसह जीव दिल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.

Breaking News: Suicide Matechi Vihirit Udi with two chimukalyans

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here