Home पुणे आळंदीत भीषण स्फोट; दोन ठार

आळंदीत भीषण स्फोट; दोन ठार

Breaking News: लक्ष्मी मेटल केमिकल कंपनीत गुरुवारी सायंकाळी भीषण स्फोट होऊन लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू.

Massive explosion in Alandi Two killed

आळंदी | पुणे : सोळू (ता. खेड) येथील बंद असलेल्या लक्ष्मी मेटल केमिकल कंपनीत गुरुवारी सायंकाळी भीषण स्फोट होऊन लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू, तर सुमारे ११ जण गंभीर जखमी झाले. प्राथमिक माहितीनुसार रोहित्राचा स्फोट होऊन लागल्याचे समोर आले होते. मात्र, महावितरणने रोहित्राचा स्फोट झाला नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या स्फोटाचे गूढ वाढले आहे. मृतांची नावे रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाहीत.

आळंदी पोलिस व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. स्फोटाने पन्नास मीटर परिघातील परिसर हादरला.

Web Title: Massive explosion in Alandi Two killed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here