संगमनेर: माझ्याशी लग्न कर नाहीतर फोटो व्हायरल करण्याची धमकी व विनयभंग
Breaking News | Sangamner Crime: संगमनेर परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग. (Molested)
संगमनेर : घराबाहेर भांडी धुणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. ही घटना बुधवारी (दि. १२) संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका कॉलनीत घडली. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला.
सलमान युनूस शेख (रा. जमजम कॉलनी, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सलमान शेख हा मुलगी राहत असलेल्या परिसरात पोहोचला. त्यावेळी ती घराबाहेर भांडी घासत होती, त्याने तिचा हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल. असे कृत्य केले. तू माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझे फोटो व्हायरल करीन, अशीही धमकी दिली. यापूर्वी शेख याने पाठलाग केला आहे, असेही फिर्यादीत म्हंटले आहे.
Web Title: Marry me or else threaten and molested the photo to go viral
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study