अहिल्यानगर: विवाहित तरुणी बेपत्ता
Breaking News | Ahilyanagar: विवाहित २४ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना.
नेवासा फाटा: नेवासा तालुक्यातील मक्तापूर येथील कोमल हंसराज लव्हाळे (वय २४) ही विवाहित महिला ११ मे रोजी बेपत्ता झाली असून यासंदर्भात नेवासा पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
पती हंसराज यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ११ मे रोजी सकाळी ते शेळ्या चारण्यासाठी शेतात गेले होते. सायंकाळी सुमारे ७ वाजता घरी परतल्यावर त्यांची पत्नी कोमल ही घरात दिसून आली नाही. नातेवाईक व शेजाऱ्यांकडे चौकशी करूनही ती सापडली नाही. अखेर त्यांनी नेवासा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. रंग गोरा, उंची अंदाजे ४.५ फूट, शरीरयष्टी सडपातळ, नाक सरळ, अंगात पंजाबी ड्रेस, गळ्यात मंगळसूत्र, पायात निळ्या रंगाचे सॅण्डल अशा वर्णनाच्या सदर महिलेबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नेवासा पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Breaking News: married young girl Missing