अहिल्यानगर: विवाहित महिलेचा विनयभंग, माझे तुझ्यावर प्रेम…..
Breaking News | Ahilyanagar: विवाहित महिलेच्या घरी जाऊन तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करीत विनयभंग करून शिवीगाळ, मारहाण केली तसेच धमकी दिल्याची घटना.
अहिल्यानगर: ३८ वर्षीय विवाहित महिलेच्या घरी जाऊन तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करीत विनयभंग करून शिवीगाळ, मारहाण केली तसेच धमकी दिल्याची घटना माळीवाडा परिसरात घडली.
याबाबत पीडित महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी यांच्या घरी अविनाश अजित नागपुरे (रा. आलमगीर, भिंगार) हा ३ मे रोजी रात्री साडेबारा वाजता आला. त्याने आवाज देऊन फिर्यादी यांना बाहेर बोलवले. फिर्यादी या बाहेर आल्या असता, तू मला खूप आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे. असे बोलल्याने फिर्यादी महिलेने त्यास नकार दिला. याचा राग येऊन नागपुरे यांनी फिर्यादीस शिवीगाळ केली. त्यावेळी फिर्यादीची आई मध्ये आली असता त्यांना देखील शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच तुमच्या परिवाराची बदनामी करील, अशी धमकी देऊन हाताच्या चापटीने मारहाण केली.
महत्वाचे: नवनवीन फिचर मिळविण्यासाठी आजच आपला अॅप अपडेट करा. येथे क्लिक करा.
याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी अविनाश नागपुरे याच्याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस अंमलदार संदीप पितळे करीत आहे.
Breaking News: Married woman’s molested my love for you