अहिल्यानगर: घरात शिरुन विवाहितेवर अत्याचार; आरोपीस अटक
Breaking News | Ahilyanagar Crime: एका गावात एकट्याच असलेल्या विवाहित तरुणीला शिवीगाळ मारहाण करून लैंगिक अत्याचार केल्याची घटना.

राहुरी: तालुक्यातील एका गावात एकट्याच असलेल्या विवाहित तरुणीला शिवीगाळ मारहाण करून लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली.
या घटनेतील महिलेचा पती रात्रपाळीच्या कामाला गेलेला होता. त्यावेळी रात्री १०:३० वाजेच्या दरम्यान, विवाहित तरुणी घरात एकटीच असल्याची संधी साधून दीपक आघाव याने तरुणीच्या घराचे दार वाजवले. तरुणीने दार उघडताच आरोपीने तिचे तोंड दाबून घरात नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. तसेच, तू जर कोणाला काही सांगितले तर मोबाईलवर काढलेले फोटो प्रसारित करेल आणि तुझ्या पतीला भर रस्त्यावर जीवंत मारीन अशी धमकी दिली. या पिडीत महिलेच्या फिर्यादीनुसार दीपक भानुदास आघाव, रा. बारागावनांदूर याच्या विरूद्ध मारहाण, धमकी व लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, पोलीस नाईक प्रमोद ढाकणे, चाँदभाई पठाण, नदिम शेख, सचिन ताजने, इफ्तेखार सय्यद, चालक संदीप रोकडे यांच्यासह पथकाने ताबडतोब आरोपीचा शोध घेऊन त्याला गजाआड केले.
Breaking News: Married woman raped by entering house Accused arrested
















































