Home अहमदनगर संगमनेर:  विवाहितेची झाडाला गळफास घेत आत्महत्या

संगमनेर:  विवाहितेची झाडाला गळफास घेत आत्महत्या

Breaking News | Sangamner: चारित्र्यावर संशय घेत दारू पिऊन मारहाण करीत असल्याने पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीची आत्महत्या.

Married woman commits suicide by hanging herself from a tree

संगमनेर : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने वडाच्या झाडाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना  पठार भागात कोठे बुद्रुक येथे घडली. सविता महादु मधे (२७) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

कोठे बुद्रुक येथे सासरी नांदत असताना पती महादु उत्तम मधे सविताच्या चारित्र्यावर संशय घेत होता. दारू पिऊन सतत शिवीगाळ व मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ करीत होता. सततच्या त्रासाला कंटाळून सविताने वडाच्या झाडाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.

याप्रकरणी कांताबाई भागा जाधव (रा. अहिनवेवाडी, ओतूर) यांनी घारगाव पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी महादु मधे याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोउनि उमेश पतंगे करीत आहे.

Web Title: Married woman commits suicide by hanging herself from a tree

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here