Home अहिल्यानगर अहिल्यानगर: विवाहितेला जाळून मारले

अहिल्यानगर: विवाहितेला जाळून मारले

Breaking News  Ahilyanagar Crime:  विवाहितेला जाळून मारल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील वडगाव येथे घडली.

married man was burnt to death

पाथर्डी : विवाहितेला जाळून मारल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील वडगाव येथे घडली. कीर्ती अनिकेत धनवे (वय २२, रा. वडगाव) असे मृत विवाहितेचे नाव आहे. ११ फेब्रुवारी दुपारी ही घटना घडली.

 सुमारे दीड वर्षापूर्वी वडगाव येथील अनिकेत धनवे व उल्हासनगर येथे राहणारी कीर्ती धनवे यांचा प्रेमविवाह झाला होता. विवाहितेचे सासरचे लोक तिला सून म्हणून मानत नव्हते. कीर्ती हिला सासरच्या लोकांनी शेतातील छप्परामध्ये मंगळवारी दुपारी जाळून ठार मारले. या घटनेनंतर विवाहितेचे वडील संतोष विठ्ठल अंग्रख (वय ५४, रा. उल्हासनगर, ता. कल्याण, जि. ठाणे) यांच्या फिर्यादिवरून कीर्ती हिचा पती अनिकेत अंकुश धनवे, सासू करुणा अंकुश धनवे, सासरे अंकुश होनाजी धनवे (सर्व रा. वडगाव, ता. पाथर्डी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.

Web Title: married man was burnt to death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here