क्रांती सेना संघटना पक्ष विधानसभा निवडणूक लढविणार
क्रांती सेना संघटना पक्ष विधानसभा निवडणूक लढविणार
काल 19/09/2018 रोजी क्रांती सेना कर्जत तालुका पदाधिकर्यांची मीटिंग शासकीय विश्राम गृह येथे मा.श्री. शब्बीर शेख (युवक जिल्हाध्यक्ष अ.नगर) यांच्या अध्यक्षतेखाली व मा.श्री.सुभाष दरेकर(जिल्हा कार्याध्यक्ष अ.नगर), मा.श्री. अविनाश कुरुमकर(जिल्हा उपाध्यक्ष अ.नगर) यांच्या प्रमुख उपस्थित पार पडली.
यावेळी सर्व स्तरीय चर्चा झाली. तसेच कोळवडी येथील बस सेवेचा प्रश्न सोडवण्यात आला .
You May Also Like: Salman Khan upcoming movies 2018 and 2019
पक्ष बांधणीचे काम उत्तम प्रकारे चालू आहे अशी माहिती ता.अध्यक्ष सुनील धांडे यांनी दिली. तसेच ता.उपाध्यक्ष गोकुळ नेटके म्हणाले की लवकरात लवकर क्रांती सेनेचा विस्तार कसा वाढेल यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे महत्वाचे आहे. यावेळी ता. युवक अध्यक्ष साजन शेख यांनी युवक आघाडीची सर्व पदे लवकरच भरणार असल्याचे सांगितले.
तसेच युवक जिल्हाध्यक्ष शब्बीर शेख म्हणाले की क्रांती सेना कर्जत जामखेड मधून विधानसभा लढवणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या क्रांती सेनेचा संदेश पोहचवा तसेच शाखेच उद्घाटन पुढील महिन्यात होईल यावेळी विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली.
1) शेततळ्यांच्या अनुदानसाठी आंदोलन बांधनी कशी करायची
2) कर्जत डेपो च काय झाल याचा जाब आ.प्रा.राम शिंदे(पालखमंत्री )यांना विचारण्यात येणार
3) शेतकरी कर्ज माफीची कायदेशीर चौकशी करायला लावणार
4) कर्जत-कुळधरण रस्त्यासाठी उचलनार पाऊल
5) भ्रष्ठ अधिकार्यांविरोधात जनते बरोबर उतरणार मैदानात
तसेच सुभाष दरेकर व अविनाश कुरुमकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दरेकर,जिल्हा उपाध्यक्ष अविनाश कुरुमकर,युवक जिल्हा अध्यक्ष शब्बीर शेख,ता.अध्यक्ष सुनील धांडे,ता.उपाध्यक्ष गोकुळ नेटके,ता.युवक अध्यक्ष साजन शेख, ता.कार्याध्यक्ष कृष्ण धांडे, ता.संपर्क प्रमुक पप्पू देशमुख, नगर उपजिल्हाध्यक्ष अजित गुंजाळ, प्रवीण तनपुरे, अक्षय तरटे, गोडसे कॉन्ट्रेक्टर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा