सकल मराठा एकवटला संगमनेरमध्ये विराट मोर्चा
सकल मराठा एकवटला संगमनेरमध्ये विराट मोर्चा
संगमनेर(प्रतिनिधी): मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी संगमनेर शहरात मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला आज संगमनेर शहरात कडकडीत बंद पाळून संगमनेरकर यांनी गुरुवारी उत्स्पुर्त पर्तिसाद दिला. शहरात सकाळीच कार्यकर्त्यांनी प्रभात फेरी काढून नागरिकांना बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला दुकानदार व्यापारी यांनी प्रतिसाद देत आपली दुकाने व्यापार बंद ठेवले तर शहरातील सर्वच पुतळ्यांना अभिवादन करून शहरातून भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली.
You May Also Like: Shahid Kapoor wife age | Mira Rajput
एक मराठा लाख मराठा घोषणा देत हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधव या रॅलीत सहभागी झाले होते. शहरातील विविध भागातून मोटारसायकल रॅली काढून प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत या रॅलीचा समारोप करण्यात आला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.