आमदाराच्या घराला लावली आग, भुजबळांच्या कार्यकर्त्याचं हॉटेल पेटवलं- Maratha Reservation
Maratha Reservation: मराठा आरक्षण मुद्दा राज्यात चिघळला आहे. लोकांनी जाळपोळ करण्यास सुरुवात केली आहे. बीड मध्ये चार ते पाच घटना.
बीडः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमध्ये आंदोलकांनी जाळपोळ करायला सुरुवात केली आहे. बीडमध्ये राष्ट्रवादी भवन पेटवल्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराला आग लावण्यात आलेली आहे. शिवाय माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यालय पेटवून देण्यात आलेलं आहे.
बीडमध्येच मंत्री छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते सुभाष राऊत यांचं हॉटेल पेटवून देण्यात आलेलं आहे. बीड शहरामध्ये आगीच्या चार ते पाच घटना घडल्या आहेत. आंदोलकांनी शांतता पाळावी, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
जाळपोळीच्या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, असं आंदोलन करणारे लोक मराठा असू शकत नाही. कुणीतरी आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सर्वांनी शांत राहून आंदोलन करावं. नाहीतर उद्या मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असं जरांगे म्हणाले. आंदोलकांनी शांतता पाळावी, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
Web Title: Maratha Reservation MLA’s house was set on fire, Bhujbal’s activist’s hotel was set on fire
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App