…….तर ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करू मनोज जरांगे यांचा इशारा
Breaking News | Ahmednagar: काही जण न्यायलायात जाण्याची भाषा करीत आहेत. ते जर न्यायलायात गेले तर आम्हालाही ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करावे लागले, असा इशारा मराठा संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांनी दिला.
अहमदनगर : राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत जो अध्यादेश काढला आहे, त्याविरोधात काही जण न्यायलायात जाण्याची भाषा करीत आहेत. ते जर न्यायलायात गेले तर आम्हालाही ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करावे लागले, असा इशारा मराठा संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांनी दिला.
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील सोमवारी अंतरवाली सराटी येथून रायगडाकडे निघाले आहेत. सोमवारी सायंकाळी मोडीलिपीचे अभ्यासक डॉ. संतोष यादव यांच्या बुरूडगाव येथील घरी त्यांनी भेट दिली. यावेळी बुरूडगाव ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकारांशी बोलताना
जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, तो माणूस सामान्य ओबीसी बांधवांचे वाटोळे करण्यास निघाला आहे. ज्या मराठा बांधवांच्या नोंदी सापडतील, अशाच मराठा बांधवांना ओबीसीतून आरक्षण मिळणार आहे. त्याला कोणीही रोखू शकत नाही. ५७ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यात दोन कोटी मराठा बांधव कुणबी होणार आहेत. उर्वरित मराठा बांधवांना सगेसोयऱ्यांच्या माध्यमातून ओबीसीचे आरक्षण मिळणार आहे. त्यात ओबीसी बांधवांचे नुकसान होणार नाही.
10 वी व 12 विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इंग्रजी शिका – Education Portal
सरकारच्या आदेशाच्या विरोधात कोणी न्यायालयात गेले तर आम्ही ओबीसी आरक्षणालाच चॅलेंज करणारी याचिका दाखल करणार आहोत. त्यातून सर्व सामान्य ओबीसी बांधवांचे वाटोळे होणार आहे. तो माणूस ओबीसी बांधवांचे वाटोळे करण्यासाठी निघालेला आहे. तो दोन समाजामध्ये शंभर टक्के वाद लावणार आहे. मराठा समाजासाठी ७० वर्षांनंतर कायदा झाला. त्याला कोट्यवधी बांधवांनी समर्थन दिले आहे. सरकारने कायदा पारित केला. तो विचारपूर्वकच केला आहे.
Web Title: Maratha Reservation Manoj Jarange warns to challenge OBC reservation
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study