Home अहमदनगर ज्यांना मोठे केले तेच विरोधात.. मनोज जरांगे पाटील

ज्यांना मोठे केले तेच विरोधात.. मनोज जरांगे पाटील

Maratha Reservation: कर्जत येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या महासभेत बोलताना मनोज जरांगे पाटील. २४ तारखेनंतरचे आंदोलन सरकारला झेपणार नाही (Ahmednagar News).

Maratha Reservation Against Those Who Were Brought up

कर्जत: आजपर्यंत मराठा समाजाने खूप त्रास सहन केला. आता बदल घडवायचा आहे. आरक्षण मिळविण्यासाठी लढा द्यायचा आहे. सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला. आम्ही ४० दिवस दिले. २४ तारखेपर्यंत सरकारकडे वेळ आहे. आरक्षण मिळाले नाही तर त्यानंतरचे आंदोलन सरकारला झेपणार नाही आणि पेलणारही नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

मराठा समाजास आरक्षण देताना कोणी आडवा आला तर त्याला टप्प्यात घेतलाच म्हणून समजा. याच जातीने अनेक राजकीय नेते मोठे केले. पण आज तेच आमच्या विरोधात उभे राहिले आहेत, याची खंत वाटते, असे जरांगे पाटील म्हणाले.

कर्जत येथे शनिवारी (दि. २१) सायंकाळी सकल मराठा समाज आयोजित महासभेत ते बोलत होते. यावेळी कर्जतमध्ये जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. मराठा जातीच्या वेदना पोटतिडकीने मांडतोय. सध्या चारही बाजूंनी मराठा समाजाला घेरले आहे. तरीही आपण एकत्र आलो आहोत. सरकारला आरक्षण द्यावेच लागणार आहे. मतभेद बाजूला ठेवा. समाजासाठी एक व्हा. आपल्यासाठी नव्हे पण पुढील पिढ्यांसाठी आरक्षण गरजेचे आहे. आपल्याला लढावे लागेल. यासाठी घर घर पिंजून काढा. समाजाशी संवाद साधा. आरक्षण का गरजेचे आहे हे समाजाला पटवून सांगा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी यावेळी केले.

जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी भव्य हार क्रेनच्या साहाय्याने कर्जतच्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज चौकात उभारला होता. यासह सात जेसीबीतून फुलांचा वर्षाव करण्यासाठी युवक उभे होते. मात्र जरांगे पाटील यांनी फुले न टाकण्याची विनंती केली. साधेपणाने सभास्थळी जाणे पसंत केले.

आरक्षण मिळविण्यासाठी फक्त एकजूट वाढवा. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार घ्यायची नाही. मी माघार घेणार नाही. तुम्ही पण मागे हटायचे नाही. पण ते आरक्षण शांतता पाळून घ्यायचे आहे. त्यासाठी कोणी जीव देऊ नका. आपले कुटुंब उघड्यावर टाकू नका, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Maratha Reservation Against Those Who Were Brought up

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here