नाशिक हादरलं… कंपनीच्या मॅनेजरची भर रस्त्यात गाडी अडवून निर्घुण हत्या, रक्ताच्या थारोळ्यात अन…
Nashik Crime: अज्ञात संशयितांनी कंपनी व्यवस्थापकावर धारदार शस्त्राने वार करत खून करून (Murder) रस्त्यावर फेकून दिले.
नाशिक: नाशिक शहरात धक्कादायक खुनाची घटना घडली आहे. पाथर्डी फाटा नजीक असलेल्या पांडवलेणी परिसरात ही घटना घडली. रात्रीच्या सुमारास अज्ञात संशयितांनी कंपनी व्यवस्थापकावर धारदार शस्त्राने वार करत रस्त्यावर फेकून दिले. त्यानंतर नाशिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. या घटनेने नाशिक शहर हादरले आहे. या घटनेबाबत रात्री इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
मुंबई नाशिक महामार्गावरील पाथर्डी फाटाजवळ कंपनी मॅनेजरवर प्राणघातक हल्ला करत त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाथर्डी फाटा नजीक असलेल्या पांडव लेणीच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेल आंगणजवळ नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कंपनीत मॅनेजर असलेल्या योगेश मोगरे यांची चारचाकी कार अडवून अज्ञात गुंडांनी त्यांच्यावर धारधार हत्यारांनी वार करून गंभीर जखमी केले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी मॅनेजर असलेले योगेश मोगरे हे आपले काम उरकून घरी निघाले होते. गरवारे येथील सर्विस रोडवरून पाथर्डी फाट्याकडे चारचाकी कारने जात होते. यावेळी हॉटेल आंगण समोर अज्ञात दोन संशयितांनी त्यांची गाडी अडवून थांबवले. यावेळी संशयितानी लपविलेले धारदार कोयते, हत्यारे काढून मोगरे यांच्या अंगावर, पाठीवर तसेच मानेवर सपासप वार केले. या हल्ल्यात योगेश मोगरे हे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. यावेळी या रस्त्यावरून जात असलेल्या रिक्षा चालकाने मोगरे यांना रिक्षात बसवून नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र आज सकाळी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, योगेश मोगरे यांच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी मॅनेजरची चारचाकी कार पळवून नेली आहे. त्यांनतर मोगरे यांना एका रिक्षा वाल्याने तातडीने उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी मॅनेजर योगेश मोगरे यांचा मृत्यू झाला आहे.
Web Title: manager of the company was brutally murder by stopping his car on the road
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App